Anuradha Vipat
हिवाळ्यात नैसर्गिकरित्या तापमान कमी असल्यामुळे पदार्थ जास्त काळ ताजे राहतात.
आज आपण पदार्थांची चव, पोषण आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूया.
भाज्या किंवा फळे कापून हवाबंद डब्यात ठेवल्यास त्यातील ओलावा टिकून राहतो
पालेभाज्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यापूर्वी कागदी टॉवेलमध्ये गुंडाळा.
हिवाळ्यात काही भाज्या जसे की बटाटे, कांदे आणि लसूण फ्रिजबाहेर थंड आणि कोरड्या जागी ठेवा.
फळे आणि भाज्या नेहमी वेगळ्या ठेवा. ज्यामुळे भाज्या लवकर खराब होणार नाहीत.
अन्न शिजवल्यानंतर लगेच हवाबंद डब्यात भरण्याऐवजी ते पूर्णपणे थंड होऊ द्या.