Anuradha Vipat
काही विशिष्ट आरोग्य समस्या असणाऱ्या व्यक्तींनी अननस खाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे.
अननसात नैसर्गिक साखर, आम्लता आणि ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते ज्यामुळे काही आजारांमध्ये त्रास होऊ शकतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी अननस खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
तीव्र आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा गॅसची समस्या आहे त्यांना अननस खाल्ल्यामुळे अम्लपित्त आणि गॅस वाढू शकतो.
अननसात असलेले ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आणि उच्च आम्लता यामुळे पोटाच्या अस्तरांना त्रास होऊ शकतो.
काही लोकांना अननसाची ऍलर्जी असू शकते.
अननसात असलेल्या ब्रोमेलेनमुळे गर्भाशयाच्या स्नायूंना चालना मिळू शकते, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो असे मानले जाते.