Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत गार वारा कानात जाणे किंवा सर्दी-कफामुळे नाक व कान यांना जोडणारी नळी बंद झाल्याने कान दुखणे व जड वाटणे ही समस्या उद्भवते.
रुमाल कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि दुखणाऱ्या कानाच्या बाहेरील बाजूला १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने शेक द्या. उष्णतेमुळे वेदना व सूज कमी होते.
गरम पाण्याच्या भांड्यावर डोक्यावर टॉवेल घेऊन ५ ते १० मिनिटे वाफ घ्या किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा.
कान बंद झाल्यासारखे वाटत असल्यास मोठी जांभई द्या, लाळ गिळा किंवा च्युइंग गम चघळा. या क्रियांमुळे कानातील हवेचा दाब संतुलित होतो.
झोपताना डोक्याखाली एक अतिरिक्त उशी ठेवा, ज्यामुळे कानातील दाब कमी होतो. ज्या कानात दुखत आहे, त्याच्या विरुद्ध कुशीवर झोपावे.
कानात गरम लसूण तेल, मोहरीचे तेल किंवा तुळशीचा रस टाकणे टाळावे. कानाचा पडदा कमकुवत असल्यास यामुळे संसर्ग किंवा मोठी इजा होऊ शकते.
कान साफ करण्यासाठी काडी, पिन किंवा कॉटन बड्स कानात घालू नका, यामुळे मळ अधिक आत ढकलला जाऊ शकतो.