Asthma In Winter : हिवाळ्यात दमा आणि श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी अशी घ्यावी स्वतःची काळजी; 'या' सोप्या टिप्स ठरतील जीवनदायी!

Anuradha Vipat

श्वसननलिका

हिवाळ्यात थंड व कोरडी हवा आणि वाढलेले प्रदूषण यामुळे श्वसननलिका आकुंचन पावतात, ज्यामुळे दमा आणि श्वसनाच्या विकारांचा त्रास अचानक बळावतो.

Asthma In Winter | agrowon

विशेष काळजी

कडाक्याच्या थंडीत दम्याचा झटका टाळण्यासाठी आणि फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी रुग्णांनी कोणती विशेष काळजी घ्यावी हे आज जाणून घेऊयात.

Asthma In Winter | agrowon

इन्हेलर आणि औषधे

इन्हेलर किंवा औषधे लक्षणे दिसत नसली तरीही बंद करू नका. बाहेर पडताना रिलीव्हर इन्हेलर नेहमी खिशात किंवा बॅगेत ठेवा.

Asthma In Winter | agrowon

तोंड आणि नाक झाकून ठेवा

थंड हवा थेट फुफ्फुसांत जाऊ नये म्हणून बाहेर जाताना स्कार्फ, मफलर किंवा मास्कचा वापर करा.

Asthma In Winter | Agrowon

बाहेर जाणे टाळा

सकाळी लवकर आणि रात्री उशिरा थंडी व धुक्यासोबत प्रदूषणाची पातळी जास्त असते. त्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्याऐवजी ऊन पडल्यानंतर व्यायाम करा.

Asthma In Winter | Agrowon

वाफ आणि कोमट पाणी

दिवसातून किमान एकदा साध्या पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्गातील कोरडेपणा व कफ कमी होतो.

Asthma In Winter | Agrowon

लसीकरण

हिवाळ्यात फ्लू आणि न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यास दम्याचा त्रास गंभीर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू लस घ्यावी.

Asthma In Winter | agrowon

Winter Dehydration : सावधान! थंडीच्या दिवसांत तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पिताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!

Winter Dehydration | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...