Deepak Bhandigare
संत्री, लिंबू आणि मोसंबी सारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक मजबूत होते
दररोज चहात लिंबू पिळून पिणे हा एक प्रभावी उपाय आहे
पालक, मेथी सारख्या हिरव्या भाज्यांत व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, यामुळे आहारात या भाज्यांचा समावेश करावा
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता जाणवते, यामुळे आहारात बांगड्या सारख्या माशांचा आहारात समावेश करावा
बदाम, भोपळ्याच्या बिया, काजूमध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात
लसूण, आले यामध्ये सूक्ष्मजंतूंना नष्ट करणारे गुणधर्म आहेत, यामुळे आल्याचा चहा पिणे अथवा आहारात लसूणचा समावेश केल्याने शरीर उबदार राहते
काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्हिटॅमिन डी श्वसन संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करते
पोषक तत्त्वांनी समृद्ध अन्न शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, मिनरल्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि चांगले बॅक्टेरिया पुरवतात