Anuradha Vipat
हिवाळ्यातील थंड हवा आणि धूळ यामुळे घसा खवखवणे, खोकला आणि छातीत कफ साचणे यांसारख्या समस्या सामान्यपणे उद्भवतात.
गोळ्या-औषधे घेण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील आजीबाईच्या बटव्यातील हे पारंपरिक उपाय त्वरित आराम देऊ शकतात.
घशातील सूज, खवखव आणि संसर्ग कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. मीठ घशातील कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करते.
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर मध घशाला मऊपणा देऊन खोकला शांत करतो. काळी मिरी कफ मोकळा करते.
हळद ही नैसर्गिक अँटी-बायोटिक म्हणून काम करते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने घशाची खवखव थांबते आणि शांत झोप लागते.
तुळशीची पाने आणि लवंग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि श्वसनमार्गातील कफ दूर करतात.
छातीत आणि नाकात साचलेला कफ मोकळा करण्यासाठी वाफ घेणे अत्यंत लाभदायक ठरते.