Anuradha Vipat
हिवाळ्यात कपाटातून बाहेर काढलेल्या ब्लँकेट आणि रजाईतील कुबट वास दूर करण्यासाठी खाली दिलेले उपाय सर्वात प्रभावी आहेत.
ब्लँकेट किंवा रजाई ३ ते ४ तास कडक उन्हात पसरवून ठेवा. उन्हामुळे ओलावा आणि बुरशीचे जंतू नष्ट होतात.
ब्लँकेटवर थोडा कोरडा बेकिंग सोडा शिंपडा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. बेकिंग सोडा दुर्गंधी शोषून घेतो.
एका स्प्रे बॉटलमध्ये समप्रमाणात पाणी आणि पांढरा व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण ब्लँकेटवर हलकेच स्प्रे करा आणि नंतर पंख्याखाली किंवा उन्हात वाळवा.
पाण्यात लव्हेंडर, टी ट्री किंवा लेमनग्रास ऑइलचे ८-१० थेंब टाकून ब्लँकेटवर फवारा. यामुळे ब्लँकेटला छान ताजा सुगंध येतो.
ब्लँकेटची घडी घालताना त्यामध्ये पातळ कागदात गुंडाळून कापराच्या वड्या किंवा ४-५ लवंगा ठेवा.
एका सुती कापडात थोडी कॉफी पावडर किंवा सुकलेली कडुलिंबाची पाने बांधून त्याची पुरचुंडी ब्लँकेटसोबत ठेवा. कॉफी कुबट वास शोषून घेण्यात अत्यंत प्रभावी ठरते.