Anuradha Vipat
हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे तहान कमी लागते, परिणामी अनेकजण खूप कमी पाणी पितात.
पाणी कमी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक आणि क्षार बाहेर पडत नाहीत. हे क्षार किडनीमध्ये साचून खडे तयार होण्याचा धोका वाढतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी घट्ट आणि गडद पिवळी होते, ज्यामुळे मूत्रमार्गात बॅक्टेरियांची वाढ झपाट्याने होते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास आतड्यांमधील मल कोरडा आणि कडक होतो, ज्यामुळे पोट साफ होत नाही. दीर्घकाळ हा त्रास राहिल्यास मूळव्याध होऊ शकतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावावा लागतो, ज्यामुळे थंडीत रक्तदाब अचानक वाढण्याचा धोका असतो.
पाणी कमी प्यायल्याने त्वचा आतून कोरडी पडते, ज्यामुळे खाज सुटणे, त्वचा फाटणे आणि एक्झिमासारखे विकार बळावतात.
आहारात गरम सूप, ताक, हर्बल टी आणि संत्री, आवळा यांसारख्या रसदार फळांचा समावेश करा.