Anuradha Vipat
हिवाळ्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने त्यांना सर्दी, खोकला आणि त्वचेचे विकार लवकर होतात.
मुलांना एकाच जाड स्वेटरऐवजी दोन-तीन पातळ सुती आणि लोकरीचे कपडे एकावर एक घाला. यामुळे शरीराची उब टिकून राहते.
अंघोळीपूर्वी कोमट खोबरेल तेल, बदाम तेल किंवा तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हाडांना बळकटी मिळते.
'व्हिटॅमिन डी' मिळवण्यासाठी सकाळी ८ ते १० या वेळेत १०-१५ मिनिटे मुलांना कोवळ्या उन्हात घेऊन बसावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांची वाढ चांगली होते.
थंड हवेमुळे मुलांची नाजूक त्वचा कोरडी पडून लालसर होते. अंघोळीनंतर लगेच डॉक्टरांनी सुचवलेले सौम्य बेबी मॉइश्चरायझर किंवा लोशन लावावे.
६ महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांना ताजे, घरी बनवलेले कोमट सूप, मऊ खिचडी, नाचणीचे सत्व, तूप, खजूर आणि हंगामी फळे द्यावीत.
बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. घरात कोणाला सर्दी-खोकला असल्यास लहान मुलांपासून अंतर राखावे आणि मुलांची खेळणी व कपडे स्वच्छ ठेवावेत.