Winter Reading List : गुलाबी थंडी आणि गरमागरम कॉफी; वाचनप्रेमींसाठी 'ही' मराठी पुस्तके ठरतील बेस्ट पार्टनर!

Anuradha Vipat

साहित्य उत्तम

थंडीच्या गुलाबी दिवसांत गरमागरम कॉफी किंवा चहाचा कप हातात घेऊन वाचण्यासाठी मनाला भिडणारे, हलकेफुलके आणि आल्हाददायक साहित्य उत्तम ठरते.

Winter Reading List | agrowon

वाचनाची मजा

हिवाळ्याची गुलाबी थंडी आणि हातात गरमागरम कॉफीचा कप असेल, तर वाचनाची मजा काही औरच असते.

Winter Reading List | agrowon

अपूर्वाई – पु. ल. देशपांडे

थंडीच्या दिवसांत खळखळून हसण्यासाठी आणि परदेश प्रवासाची सफर घरबसल्या करण्यासाठी पु. ल. देशपांडे यांचे हे प्रवासवर्णन सर्वोत्तम आहे.

Winter Reading List | agrowon

कोसला – भालचंद्र नेमाडे

शांत आणि निवांत हिवाळी दुपारी पांघरुणात बसून वाचण्यासाठी 'कोसला' हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

Winter Reading List | agrowon

पार्टनर – व. पु. काळे

नातेसंबंधांची गुंफण, आयुष्याचे तत्त्वज्ञान आणि मनाला स्पर्श करणारी संवादशैली ही वपुंच्या लेखनाची खासियत आहे. 'पार्टनर' वाचताना प्रत्येक पानावर आपल्याच आयुष्यातील कोणाची तरी आठवण येते आणि मन प्रसन्न होते.

Winter Reading List | agrowon

एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर

थंडीच्या दिवसांत मनाला उभारी आणि प्रेरणा देणारे हे एक अतिशय सुंदर चरित्र आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत महान शास्त्रज्ञ बनलेल्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा प्रवास प्रत्येक वाचकाच्या मनाला भिडतो.

Winter Reading List | agrowon

श्यामची आई – साने गुरुजी

साधे, सरळ पण अंतःकरणाला पाझर फोडणारे हे पुस्तक कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वयात वाचण्यासारखे आहे.

Winter Reading List | agrowon

Geyser Electricity Bill : थंडीत गिझरमुळे वीज बिल डबल येतंय? 'या' स्मार्ट टिप्स वापरून करा बिलात मोठी बचत!

Geyser Electricity Bill | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...