Team Agrowon
‘गोगलगाय अन् पोटात पाय’ पण या शंखी गोगलगायींनी आपले पोटातले पाय बाहेर काढणे सुरू केले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाची शंखी गोगलगाय धुमाकूळ घालू शकते.
यंदाही खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांना या गोगलगायींनी लक्ष करणे सुरू केले आहे.
गतवर्षाच्या खरीप हंगामात शंखी गोगलगायींनी मराठवाड्यातील जवळपास ५५ हजार २७७ हेक्टरवरील शेती पिकाला दणका दिला होता.
धाराशिव जिल्ह्यातील ४५७८ हेक्टर, बीडमधील ४७८ हेक्टर, जालन्यातील ३११ हेक्टर, छत्रपती संभाजी नगरमधील १९५ हेक्टर, हिंगोलीतील ६० हेक्टर, परभणीतील ३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे गोगलगायींमुळे नुकसान झाले होते.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक जवळपास ४८ हजार हेक्टर वरील पिके या गोगलगायींनी फस्त केली होती.
गोगलगायी सोयाबीन, कपाशी, मोसंबी आदी पिकांवर आक्रमण करतात. याशिवाय मोसंबीची फळ, कोवळी पान, खोडाची साल त्या खातात.
पिकामध्ये केलेल्या मल्चिंगखाली लपून बसणाऱ्या गोगलगायी रात्रीच्या वेळी पिकावर आक्रमण करतात. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतात मल्चिंग केले नाही.
Shravan Month : ऋषी-कृषी संस्कृतीने उत्सवांची रुजवणूक करणारा श्रावण मास