Shravan Month : ऋषी-कृषी संस्कृतीने उत्सवांची रुजवणूक करणारा श्रावण मास

Team Agrowon

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.

Shravan Month | Agrowon

आपले सगळेच उत्सव हे निसर्गस्नेही आहेत. आपल्या रोजच्या धकाधकीच्या नीरस जगण्याने निघून आटत चाललेली जीवनमूल्ये पुन्हा रुजविण्यासाठी आपल्या ऋषी-कृषी संस्कृतीने असंख्य उत्सवांची रुजवणूक केली आहे.

Shravan Month | Agrowon

श्रावणात मंगळागौरी पूजन, नागपंचमी, मोहरम, रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) स्वातंत्र्य दिन, पतेती, श्रीकृष्णाष्टमी आणि श्रावणी पोळा अशा सणांची रेलचेल असते.

Shravan Month | Agrowon

श्रावण महिन्यात घरात अन्नपदार्थांची नवनवीन चव चाखायला मिळत असते. ऋतूनुसार आहारशास्त्राला आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे.

Shravan Month | Agrowon

श्रावण म्हटलं, की रानभाज्यांची रेलचेल जरा जास्तच वाढू लागते. जिथे ओसाड माळरान आहे, पाऊस अगदीच जेमतेम पडतो अशा कोरडवाहू भागात देखील आपल्याला रानभाज्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

Shravan Month | Agrowon

श्रावणसरींची शेतकरी बांधवही वाट पाहत असतात. कारण मोठ्या कष्टाने पेरलेली पिकं याच महिन्यात डोलताना दिसतात. याच काळात पिकांना फुलोरा येतो.

Shravan Month | Agrowon

श्रावणात येणारे सण- वार साधेपणाने साजरे केले गेले, तर प्रत्येक उत्सव हा आपल्या सर्वांच्याच जीवनात उन्नत विचारांसोबतच आनंद, भरभराट आणि निरामय स्वास्थ्य घेऊन येणारा असेल.

Shravan Month | Agrowon

Karvand Health Benefits : जंगलातील हा रानमेवा आहे पोटाच्या समस्यांवर रामबाण

आणखी पाहा...