Pond Farm: शेततळ्यासाठी नवीन योजना येणार?

Team Agrowon

कोकणासह राज्यातील अन्य ठिकाणी डोंगराळ भागातील पाणी अडविण्यासाठी छोटे बंधारे बांधण्यासाठी नवी योजना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आणू, असे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. १४) दिले.

Farm Pond Scheme | Agrowon

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे प्रलंबित असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला असता भास्कर जाधव यांनी कोकणातील डोंगर उतारावरील पाणी वेगाने वाहून जाते.

Farm Pond Schem | Agrowon

तेथे विहिरी काढण्यासाठी १५ ते १६ लाख रुपये लागतात. त्यामुळे शेततळे योजनेचा विस्तार करण्याची गरज आहे, अशी मागणी केली. तसेच भाजपच्या आशिष शेलार यांनीही कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मागणी केली असता मुंडे यांनी ही घोषणा केली.

Farm Pond Scheme | Agrowon

लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर शेततळ्यांपैकी जवळपास ६९३ शेततळ्यांची tकामे अद्याप सुरू झाली नाहीत.

Farm Pond Scheme | Agrowon

तसेच राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कोरडवाहू शेतकरी अडचणीत आला असल्याची बाब देशमुख यांनी निदर्शनास आणली.

Farm Pond Scheme | Agrowon

शेततळ्याचे ४८८७ अर्ज लॉटरी पद्धतीने नाकारले आहेत. मराठवाड्यात २८ हजार शेततळ्यांची मागणी आहे पण ती पूर्ण होत नाही, असाही मुद्दा उपस्थित केला.

Farm Pond Scheme | Agrowon
क्लिक करा