Wild Vegetables : रानभाज्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत घेतील काळजी

sandeep Shirguppe

रानभाजी

पावसाळा म्हणजे भाज्यांची कमतरता, कडाडलेले दर, गृहिणींना सतावणारी मुलांच्या डब्यांची चिंता नेहमीचीच आहे.

Wild Vegetables | agrowon

रानभाजी आरोग्य

परंतु माळरानावर येणारी ''रानभाजी'' तुमचे आरोग्य आणि पैशांच्या बचतही करेल, रानभाज्यांची पारंपरिक ओळख ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आहे.

Wild Vegetables | agrowon

घोळ

घोळ ही मूळव्याधासाठी गुणकारी असून रक्तशुद्धी, मूत्रपिंड, दातांतून रक्त जाण्यावर उपयोगी ठरते.

Wild Vegetables | agrowon

Wild Vegetablesटाकळा

हृदयविकार, खोकला, श्वसनविकार, खरूज, वात, कफदोष कमी करण्यासाठी टाकळा भाजी खावी. याच्या बियांचा लेप जखमेवर गुणकारी असतो.

Wild Vegetables | agrowon

वाघाटी

वाघाटी पित्तशामक असून सूतिका ज्वरामध्ये त्याचा काढा पिल्यास फायदा होतो. थायरॉईड ग्रंथी कार्यात बिघाड झाल्यास वाघाटी भाजीच्या सेवनाचा लाभ होतो.

Wild Vegetables | agrowon

शेवगा

दुधापेक्षा चौपट कॅल्शियम, तीन केळांइतके पोटॅशियम, सहा संत्र्यांइतके 'क' जीवनसत्त्‍व शेवगा भाजीत आढळून येते.

Wild Vegetables | agrowon

मायाळू

अंगावर पित्त उठल्यास याची पाने चोळतात. कफकारक, पौष्‍टिक व ज्वरनाशक अशी ही वनस्पती आहे. पानांची भाजी, पातळ भाजी करून खातात.

Wild Vegetables | agrowon

आघाडा

आघाडीची मुळे, पाने, फुले, फळे औषधी आहेत. आम्लतानाशक, रक्तवर्धक, पित्तसारक गुणधर्माचा आघाडा अंगातील चरबी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

Wild Vegetables | agrowon

केना

त्वचाविकार, सूज, पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त केना भाजीच्या सेवनाने लघवी साफ होण्यास मदत होते.

Wild Vegetables | agrowon

गुळवेल

गुळवेल, गोकर्ण, मायाळूसारख्या वनस्पती आपल्या घरातील कुंडीमध्येही वाढविता येतात.

Wild Vegetables | agrowon
आणखी पाहा...