Ugliest Dog : जगातला सर्वात कुरूप कुत्रा झाला लाखोंचा धनी

Mahesh Gaikwad

इमानदार प्राणी

कुत्रा हा सर्वात इमानदार आणि विश्वासू प्राणी आहे. जगभरात कुत्र्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात.

Ugliest Dog | Agrowon

सुंदर श्वान

कुत्र्यांच्या काही जाती त्यांच्या सुंदर दिसण्यामुळे लोकांना आकर्षित करतात. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात कुरूप कुत्र्याबद्दल सांगणार आहोत.

Ugliest Dog | Agrowon

कुरूप श्वानांची स्पर्धा

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये दरवर्षी कुत्र्यांची एक स्पर्धा आयोजित केली जाते. पण ही स्पर्धा सुदंर श्वानांची नाही, तर सर्वात कुरूप दिसणाऱ्या श्वानांची असते.

Ugliest Dog | Agrowon

पुरस्कार

या स्पर्धेत सर्वात कुरूप दिसणाऱ्या श्वानाला विजेता घोषित करून पुरस्कार दिला जातो.

Ugliest Dog | Agrowon

वाईल्ड थांग

२०२४ या वर्षातील श्वानांची ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये वाईल्ड थांग नावाच्या श्वानाला जगातील सर्वात कुरूप कुत्र्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Ugliest Dog | Agrowon

५ हजार डॉलर्स बक्षिस

अॅन लुईस ही या कुत्र्याची मालकीन असून स्पर्धा जिंकल्यानंतर या श्वानाला ५ हजार डॉलर्सची रक्कम पुरस्कारामध्ये देण्यात आली आहे.

Ugliest Dog | Agrowon

पेकिंगीज जात

वाईल्ड थांग हा कुत्रा पेकिंगीज जातीचा आहे. या श्वानाचे वय ८ वर्षे असून या जातीचा श्वान सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता.

Ugliest Dog | Agrowon

३ वेळा स्पर्धेत सहभागी

वाईल्ड थांग हा कुत्रा अमेरिकेच्या ओरेगन स्थित नॉर्थ बेंड शहरातील असून यापूर्वी या श्वानाने या स्पर्धेमध्ये तीनवेळा सहभाग घेतला आहे.

Ugliest Dog | Agrowon

श्वानांची स्पर्धा

तीनही वेळेस हा श्वान दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. परंतु यंदाच्या वर्षी या श्वानाने पहिला क्रमांक पटकावत स्पर्धा जिंकली आहे.

Ugliest Dog | Agrowon

आजाराने ग्रस्त

वाईल्ड थांग हा कुत्रा डिस्टेम्प्टर नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि श्वसन प्रणाली संक्रमिक होते.

Ugliest Dog | Agrowon