Slowest Train India : भारतातील सर्वात मंदगतीची रेल्वे ; ताशी वेग आहे....

Mahesh Gaikwad

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी वाहतूक व्यवस्था आहे. भारतात सर्वदूर रेल्वेचे जाळे पसरले आहे.

Slowest Train India | Agrowon

रेल्वे प्रवास

भारतात दररोज तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. अलिकडच्या काळात भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहे.

Slowest Train India | Agrowon

बुलेट ट्रेन

सुरूवातीच्या काळात कोळशावर झुकझुक चालणाऱ्या रेल्वेचा प्रवास आता हायस्पीड बुलेट ट्रेनपर्यंत येवून पोहचला आहे.

Slowest Train India | Agrowon

हायस्पीड रेल्वे

भारतात सध्या राजधानी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि वंदे भारतसारख्या हायस्पीड रेल्वेगाड्या आहेत.

Slowest Train India | Agrowon

मंदगतीने धावणारी रेल्वे

अतिवेगाने धावणाऱ्या रेल्वे जरी असल्या तरी भारतात एक रेल्वे अशीही आहे, जी आजही मंदगतीने धावते. या रेल्वेचा ताशी वेग १० किमी इतका कमी आहे.

Slowest Train India | Agrowon

सर्वात स्लो ट्रेन

या रेल्वेला भारतातील सर्वात मंदगतीने धावणारी रेल्वे म्हणून ओळखतात. मेट्टुपालयम उटी नीलगिरी पॅसेंजर ट्रेन असे या रेल्वेचे नाव आहे.

Slowest Train India | Agrowon

ताशी वेग १० किमी

भारतातील सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे मेट्टुपालयम आणि उटी दरम्यान धावते. या दोन स्टेशनमधील अंतर केवळ ४६ किलोमीटर आहे.

Slowest Train India | Agrowon

५ तासांचा प्रवास

४६ किमी अंतर पार करण्यासाठी या रेल्वेला कमीत कमी ५ तासांचा वेळ लागतो. या रेल्वेचा वापर पर्यटकांकडून केला जातो.

Slowest Train India | Agrowon

प्रमुख स्थानके

मेट्टुपालयम आणि उटी दरम्यान प्रवासात कुन्नूर, वेलिंग्टन, लव्हडेल आणि ओटाकमुंड ही स्थानके लागतात.

Slowest Train India | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....