Team Agrowon
उसाचे पाचट म्हणजेच पाला काढल्याने उसाची संख्या नियंत्रण होते तसेच जाड कोंब ठेवुन लहान मरके कोंब काढले जातात.
उसाच्या बुडातील पाचट निघाल्याने हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यास मदत होते. उसाला नविन वॉटर शूट फुटतात. त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार आणि वजनदार बनतो.
पाचट काढल्यामुळे कांडी कीड, मिलिबग तसच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. योग्य वयातच आपण बुडातील कोवळा वाळलेला पाला काढतो. त्यामुळं तो लगेच कुजून जातो त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक ऍड केले जातात.
उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याची बचत होते. पाचट आच्छादन केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
पाचट काढून जमिनीवर आच्छादन केल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
ज्यावेळी आपल्या उसाचे बुडातील ४ ते ५ टोपणे सुकून जातात त्याच वेळी उसाचे पाचट काढावे. उसाचे पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढावीत.
हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील उसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत.एका निरोगी वाढणाऱ्या उसाला नऊ ते बारा पर्यंत पाने असतात.