Anuradha Vipat
औषधे घेतल्यानंतर लगेच फळे खाणे किंवा त्यांचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
फळांमधील घटक औषधांचा प्रभाव कमी करतात किंवा त्याचे दुष्परिणाम वाढवतात.
द्राक्ष किंवा मोसंबीसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये 'फुरानोकाउमारिन्स' नावाचे रसायन असते. हे रसायन आपल्या पोटातील CYP3A4 एन्झाईमला ब्लॉक करते, जे औषध पचवण्याचे काम करते.
सफरचंद, संत्री किंवा गाजराचा ज्यूस शरीरातील औषध रक्तात शोषून घेणारे प्रोटीन ब्लॉक करतो. यामुळे औषध रक्तात पूर्णपणे शोषले जात नाही
औषधानंतर लगेच ऍसिडिक ज्यूस पोटात गेल्याने गोळ्यांचे विघटन व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे उलट्या, मळमळ किंवा पोटात जळजळ होऊ शकते
कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ज्यूसमुळे बीपी अचानक खूप कमी होऊ शकते.
ज्यूससोबत घेतल्यास स्नायूंमध्ये तीव्र वेदना सुरू होऊ शकतात.