Anuradha Vipat
घरीच नैसर्गिक साहित्याचा वापर करून फ्रूट फेशियल करणे हा त्वचेला ग्लो देण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.
फळांमध्ये असणारे नॅचरल एन्झाईम्स आणि अॅसिड्स त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात.
कापूस दुधात बुडवून पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. २ मिनिटांनी चेहरा ओल्या रुमालाने पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि जास्तीचे तेल निघून जाते.
पपई किंवा केळीचा गर हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर गोलाकार ३ ते ४ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि मृत त्वचा निघून जाईल.
डाळिंबाचा रस किंवा संत्र्याचा गर हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने ५ ते ७ मिनिटे चांगला मसाज करा.
पिकलेली केळी किंवा सफरचंदाचा गर, बेसन किंवा मुलतानी माती ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि शेवटी हलके मॉइश्चरायझर लावा.
चेहऱ्यावर फळे लावण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करून घ्या, जेणेकरून कोणत्याही फळाची अॅलर्जी असणार नाही.