Mahesh Gaikwad
एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, भेंडी अनेक आजारांवर गुणकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. रोज सकाळी उपाशीपोटी भेंडीचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
भेंडीतील चिकट पदार्थामुळे (म्युसिलेज) पचनसंस्थेला चालना मिळते. भेंडीचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यापासून आराम मिळतो.
भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन-सी आणि फ्लॅव्होनॉईड्स असतात. जे शरीरातील विषारी घटक काढून टाकतात आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करतात.
भेंडीमध्ये सोल्युबल फायबर आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात. उपाशीपोटी भेंडीचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
भेंडीचे पाणी प्यायल्याने त्वचा उजळते, कोरडेपणा कमी होतो आणि केसांची चमकही वाढते. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे एजिंगची समस्या कमी होते.
भेंडीतील तंतुमय पदार्थ (फायबर) कोलेस्ट्रॉल शोषून घेते आणि शरीरातून बाहेर टाकते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते.
२-३ ताज्या भेंडी धुऊन, दोन्ही बाजूंनी कापून रात्री एक ग्लास पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्या. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.