Mahesh Gaikwad
आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल, लॅपटॉप वापरावर अनेकांचे नियंत्रण राहत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. स्क्रिनटाईम नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टीप्स.
आपल्या दिवसभरातील वेळापैकी स्क्रीन वापरण्याचा वेळ ठरवून ठेवा. यामुळे आपण जाणीवपूर्वक वेळेचे नियोजन करू शकतो.
मोबाईलवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे आपण मोबाइल पाहतो. गरजेचे नसलेले अॅप्सचे नोटिफिकेशन बंद केल्याने स्क्रीन वेळ कमी करणे शक्य आहे.
अभ्यास, काम किंवा झोपताना ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड वापरा. यामुळे तुम्हाला अडथळा येणार नाही आणि अनावश्यक स्क्रीन टाईम टळेल.
इंस्टाग्राम, फेसबुकसारखे अॅप्ससाठी वापरण्यासाठी दररोजचा वेळ ठरवून घ्या. फोनमध्ये अॅप टाईमर वापरा जे अॅप वापराची मर्यादा ठरवते.
झोपण्याची खोली, जेवणाचे टेबल अशा ठिकाणी मोबाईल वापरणे टाळा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि स्क्रीन टाइम आपोआप कमी होतो.
सतत ऑनलाईन गेम्स, सिरीज पाहण्याऐवजी वाचन, मैदानी खेळ किंवा गप्पा यासारख्या ऑफलाइन गोष्टींचे छंद जोपासा.
मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये "Digital Wellbeing" किंवा "Screen Time" सारखी फीचर्स वापरून स्क्रीनवर किती वेळ जातो यावर नियंत्रण ठेवा.