Sowing Machine: ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र वापरावे का? जाणून घ्या फायदे आणि काळजी

Swarali Pawar

पेरणीतील चुका टाळायच्या?

वेळेत आणि अचूक पेरणी झाली तरच चांगले उत्पादन मिळते.
यासाठी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Tractor Seed Drill | Agrowon

हे यंत्र काय काम करते?

हे यंत्र बियाणे आणि खत योग्य प्रमाणात, योग्य खोलीवर टाकते.
त्यामुळे प्रत्येक रोपाला समान जागा मिळून उगवण चांगली होते.

Tractor Seed Drill | Agrowon

कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?

सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, मूग, उडीद आणि ज्वारीसाठी हे यंत्र वापरता येते.
मोठ्या क्षेत्रात कमी वेळेत पेरणी करणे शक्य होते.

Tractor Seed Drill | Agrowon

वेळ आणि मजुरीची मोठी बचत

या यंत्रामुळे कमी वेळेत जास्त क्षेत्राची पेरणी करता येते.
मजुरी, इंधन आणि पेरणीचा खर्चही कमी होतो.

Tractor Seed Drill | Agrowon

बियाणे आणि खताचा अपव्यय कमी

बियाणे समान अंतरावर पडते आणि खत योग्य ठिकाणी पोहोचते.
यामुळे दोन्हीचा परिणामकारक वापर होतो.

Tractor Seed Drill | Agrowon

उगवण होते एकसारखी

योग्य खोलीवर पेरणी झाल्यामुळे रोपे एकसारखी उगवतात.
यामुळे अपेक्षित रोपसंख्या मिळून उत्पादन वाढण्यास मदत होते.

Tractor Seed Drill | Agrowon

पेरणीपूर्वी ही काळजी घ्या

यंत्राचे कॅलिब्रेशन करून बियाणे आणि खताचा दर तपासा.
पेरणीपूर्वी थोड्या क्षेत्रात चाचणी घेणेही आवश्यक आहे.

Tractor Seed Drill | Agrowon

यंत्राची देखभाल महत्त्वाची

पेरणीनंतर यंत्र स्वच्छ करून खत आणि बियाणे काढून टाका.
ग्रीस-तेल लावून यंत्र कोरड्या ठिकाणी ठेवल्यास ते अधिक काळ टिकते.

Tractor Seed Drill | Agrowon

Soybean BBF Cultivation: कमी पावसातही सोयाबीनचे चांगले उत्पादन! बीबीएफ पद्धत ठरेल फायदेशीर

अधिक माहितीसाठी...