Indian Railway : रेल्वेच्या डब्ब्यांवरील ५ अंकी कोडचं कोडं काय असतं? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

भारतीय रेल्वे

भारतात दररोज तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची वाहतूक व्यवस्था आहे.

Indian Railway | Agrowon

प्रवाशांसाठी सुविधा

अलिकडच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्याच्या हेतून रेल्वे गाड्यांच्या रचनेत मोठे बदल केले आहेत.

Indian Railway | Agrowon

रेल्वेचा प्रवास

तुम्हीही रेल्वेने कधी ना कधी प्रवास केला असेल. अनेकांना रेल्वेच्या डब्ब्यांवर असलेल्या ५ अंकी आकड्याचे कोडे पडलेले असते.

Indian Railway | Agrowon

पाच अंकी कोड

डब्ब्यावरच्या या पाच अंकी कोडचाही विशेष अर्थ असतो. संबंधित रेल्वेची ओळख व्हावी, यासाठी हा पाच अंकाचा कोड डब्ब्यावर छापलेला असतो.

Indian Railway | Agrowon

डब्बा बनविलेले वर्ष

या पाच अंकातील पाच अंकातील सुरुवातीचे पहिले दोन अंक म्हणजे तो डब्बा कधी बनविला ते वर्ष सांगतात.

Indian Railway | Agrowon

डब्ब्याच्या श्रेणीची माहिती

तर त्यानंतरचे तीन आकडे त्याच्या श्रेणीची माहिती देणारे असतात. उदा: जर एखाद्या डब्ब्यावर २२२७३ हा आकडा असेल, तर तो डब्बा २०२२ मध्ये तयार करण्यात आला असून तो स्लिपर क्लासचा डब्बा आहे.

Indian Railway | Agrowon

डब्ब्याची श्रेणी

पण डब्ब्यावरील आकड्यावरून त्याच्या श्रेणीबद्दल कळावे, यासाठी एसी, स्लिपर, जनरल यांची एक रेंज ठरविण्यात आली आहे.

Indian Railway | Agrowon

श्रेणीनुसार क्लास

या श्रेणीनुसार, ००१-०२५ एसी फर्स्ट क्लास, १०१-१५० थ्री टीयर, १५१-२०० चेअरकार आणि २०१-४०० स्लिपर क्लाससाठी असतात.

Indian Railway | Agrowon

डब्ब्यांच्या श्रेणींची वर्गवारी

अशाच प्रकारे शेवटचे तीन अंक ४०१-६०० जनरल डब्बा आणि ६०१-७०० सेकंड क्लासचे डब्ब्यांच्या माहिती देतात.

Indian Railway | Agrowon

शेवटचे तीन अंक

जर एखाद्या डब्ब्यावरील शेवटचे तीन अंक ८०० किंवा त्यापुढील असतात, ते डब्बे मेल, जनरेटर किंवा पँट्रीचे असतात.

Indian Railway | Agrowon
Indian Railway | Agrowon