Mahesh Gaikwad
भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकांची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. भारतात दररोज तीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
अलिकडच्या काळात भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. रेल्वेकडून प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकीकडे भारतीय रेल्वेच्या सुविधांमध्ये सुधारणा होत असल्या, तरी भारतातील एक राज्य असे आहे, जेथे रेल्वेची एकही लाईन नाही.
भारतातील सिक्किम या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही. या राज्यात स्टेशन तर सोडाच पण साधी रेल्वे लाईनसुध्दा नाही.
१६ मे १९७५ मध्ये सिक्किम भारतात २२ वे राज्य म्हणून विलिन झाले होते. मात्र, इतक्या वर्षांनंतरही सिक्किममध्ये रेल्वेची लाईन पोहचू शकली नाही.
रेल्वेने सिक्किमला जाण्यासाठी प्रवाशांना शेजारी पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी किंवा जलपायगुडी या रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते.
दरम्यान, भारत सरकारने सिक्किममध्ये रेल्वेची सुविधा सुरू करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. जो २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.