Ratoon Cotton: फरदड कापूस का टाळावा? जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची कारणे

Swarali Pawar

तात्पुरता फायदा, कायम नुकसान

फरदड कपाशीमुळे थोडे उत्पादन मिळते. मात्र पुढील हंगामातील उत्पादन आणि नफा कमी होतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

बीटी कापसावर प्रतिकारशक्ती वाढते

फरदड घेतल्याने बोंड अळ्यांना बीटी प्रथिनांची सवय लागते. यामुळे अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊन कीड नियंत्रण कठीण होते.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

कापसाची प्रत व दर्जा घटतो

फरदड कपाशीला योग्य पोषण मिळत नाही. धाग्याची लांबी, मजबुती व बाजारभाव कमी होतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

कीड व रोगांचा प्रादुर्भाव

पीक जास्त काळ शेतात राहिल्याने किडींना पोषक वातावरण मिळते. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

हंगामानंतरही अळ्या जिवंत राहतात

फरदड कपाशीमुळे अळ्यांना अन्न मिळत राहते. पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव लवकर वाढतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

पांढरी माशी व पिठ्या ढेकूण वाढतात

हंगामाच्या शेवटी पांढरी माशी मोठ्या प्रमाणात वाढते. फरदड घेतल्यास पुढील हंगामातही किडींचा धोका वाढतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

खर्च वाढतो

फरदड कपाशीला नियमित पाणी व फवारण्या लागतात. यामुळे शेतीचा एकूण खर्च वाढतो.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

तज्ज्ञांचा सल्ला

फरदड कपाशीमुळे जमीन, पीक आणि नफा तिन्हींचे नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांनी फरदड कपाशी टाळावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Disadvantages of Ratoon Cotton | Agrowon

Turmeric Harvesting: हळद काढणी- सुधारित की पारंपरिक? योग्य निवड करा

अधिक माहितीसाठी