Swarali Pawar
हळद हे महत्त्वाचे नगदी मसाला पीक आहे. चुकीच्या काढणीमुळे उत्पादनात व गुणवत्तेत मोठे नुकसान होऊ शकते.
काढणीपूर्वी १५ ते ३० दिवस पाणी हळूहळू कमी करून बंद करावे. यामुळे अन्नरस कंदात उतरतो व हळकुंड वजनदार व चकचकीत होतात.
हलक्या जमिनीत ८०–९०% तर मध्यम जमिनीत ६०–७०% पाने वाळलेली दिसतात. ही हळद काढणीस योग्य वेळ असल्याचे लक्षण आहे.
पाला पूर्ण वाळल्यानंतर जमिनीपासून १ इंच वर खोड ठेवून कापावा. शेत ४–५ दिवस तापू द्यावे, त्यामुळे काढणी सोपी होते.
गादीवाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित यंत्राने हळद काढता येते. या पद्धतीत कंदांना इजा न होता जलद काढणी होते.
९८–९९% कंद निघतात आणि मजुरी खर्च कमी होतो. मोठ्या क्षेत्रासाठी ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते.
टिकाव किंवा कुदळीने कंद उपसून काढणी केली जाते. ही पद्धत सरी-वरंबा व गादीवाफा दोन्हीत वापरता येते.
१०–१५% कंद जमिनीत राहतात व मजुरी खर्च जास्त होतो. शेताच्या परिस्थितीनुसार योग्य पद्धत निवडल्यास नफा वाढतो.