Anuradha Vipat
पुरणपोळी खाल्ल्यानंतर सुस्ती किंवा झोप येण्यामागे शास्त्रीय आणि पचनक्रियेशी संबंधित काही महत्त्वाची कारणे आहेत.
पुरणपोळीमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि साखर किंवा गूळ असतो यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
पुरणपोळीतील चणा डाळीमध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ॲसिड असते. यामुळे मेंदूमध्ये 'सेरोटोनिन' नावाचे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक झोप येण्यास कारणीभूत ठरते
पुरणपोळी हा पचायला जड पदार्थ आहे. ती पचवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते
पुरणपोळीमुळे मेंदूला मिळणाऱ्या रक्ताचे प्रमाण काही काळासाठी कमी होते आणि आपल्याला सुस्ती जाणवते.
पुरणपोळीसोबत आपण भरपूर तूप खातो. तुपामुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीरात जडपणा येतो जो सुस्ती वाढवण्यास मदत करतो
पुरणपोळी खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी शतपावली करा.