Anuradha Vipat
जर तुम्हाला तीव्र खोकल्याचा त्रास होत असेल आणि तो झटपट कमी करायचा असेल तर आले आणि मध यांचा हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.
आल्याचा एक छोटा तुकडा किसून त्याचा रस काढा. एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण दिवसातून २-३ वेळा चाटा.
कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून गुळण्या केल्याने घशातील सूज कमी होते .
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.
जर कोरडा खोकला असेल, तर चिमूटभर काळी मिरी पूड मधासोबत घेतल्याने फायदा होतो.
साध्या गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वासनलिका मोकळी होते आणि साचलेला कफ बाहेर पडतो.
खोकला असताना थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम, थंड पाणी आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा