Sleep Walking : तुम्हालाही आहे झोपेत चालण्याची सवय? जाणून घ्या कारणे

Mahesh Gaikwad

झोपेत चालण्याची सवय

एखाद्याला झोपेत चालण्याची सवय असते, असे तुम्ही कधीतरी ऐकले असेल. तुमच्या कुंटुंबातील किंवा परिचयातील व्यक्तीला झोपेत चालण्याची समस्या असू शकते.

Sleep Walking | Agrowon

झोपेत चालण्याची समस्या

झोपेत चालण्याची समस्या सहसा झोपल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये होते. झोपेत चालणे यालाच स्लिप वॉकिंग असेही म्हणतात.

Sleep Walking | Agrowon

झोपेत चालण्याची कारणे

आज आम्ही तुम्हाला काही लोक झोपेत का चालतात? याच्यामागे नक्की काय कारण आहे, याची माहिती सांगणार आहोत.

Sleep Walking | Agrowon

स्लिप वॉकिंग

स्लिप वॉकिंग ही एक स्थिती असते, जी मेंदूच्या विकारामुळे उद्भवते. यामध्ये व्यक्ती झोपेतच उठून चालायला लागते.

Sleep Walking | Agrowon

लहान मुलांमध्ये समस्या

झोपेत चालण्याची समस्या कोणत्याही वयात होवू शकते. लहान मुलांमध्ये ही समस्या सामान्य असून तारूण्यावस्थेत जवळजवळ निघून जाते, असे तज्ज्ञ सांगतात.

Sleep Walking | Agrowon

शांत झोप

झोपेत चालण्याच्या समस्येमागे अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा शांत किंवा चांगली झोप न लागल्यामुळेही ही समस्या होवू शकते.

Sleep Walking | Agrowon

समस्येची कारणे

कधीकधी काही आजार किंवा औषधांमुळेही झोपेत चालण्याची समस्या उद्भवू शकते. काळजी, अतिचिंता यासारख्या कारणांमुळेही ही समस्या होवू शकते.

Sleep Walking | Agrowon

चिडचिडेपणा

लहान मुलांमध्ये आजारांच्या कारणांमुळे चिडचिडेपणा होतो, ज्यामुळे झोप पूर्ण होत नसल्यानेही मुले झोपेत चालू लागतात.

Sleep Walking | Agrowon

जीवनशैली

स्लिप वॉकिंगने ग्रस्त लोकांचे जीवन सामान्य लोकांप्रमाणेच असते. या समस्येवर विशिष्ट असे कोणतेही उपचार नाहीत. पूर्ण झोप घेणे तसेच आरामदायक जीवनशैलीचे पालन यामध्ये फायदेशीर ठरतात.

Sleep Walking | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....