National Farmer's Day 2023 : राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरा केला जातो?

Mahesh Gaikwad

शेती व्यवसाय

शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ८० टक्के लोक शेती आणि शेतीसंबंधी व्यवसायावर अवलंबून आहेत.

National Farmer's Day | Agrowon

जगाचा पोशिंदा

जगाची अन्नाची गरज भागविणाऱ्या शेतकऱ्याला 'जगाचा पोशिंदा' म्हणतात. याच शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून शेतकरी दिन साजरा केला जातो.

National Farmer's Day | Agrowon

शेतकरी नेते

देशात शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे अनेक नेते झाले. पण देशाचे पंतप्रधानपद भूषवलेल्या चौधरी चरणसिंह यांना शेतकरी खऱ्या अर्थाने आपला कैवारी मानतात.

National Farmer's Day | Agrowon

राष्ट्रीय शेतकरी दिन

राष्ट्रीय शेतकरी दिन २३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात.

National Farmer's Day | Agrowon

शेती क्षेत्रातील योगदान

पंतप्रधानपदाच्या आपल्या छोट्या कार्यकाळात चौधरी चरणसिंह यांनी शेती क्षेत्रातील सुधारणांच्या धोरणांमध्ये मोठे योगदान दिले.

National Farmer's Day | Agrowon

चौधरी चरणसिंह

देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या अल्प कार्यकाळामध्ये चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.

National Farmer's Day | Agrowon

शेतकऱ्यांचे कैवारी

देशातील शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरणसिंह यांनी विशेष प्रयत्न केले.

National Farmer's Day | Agrowon

चौधरी चरणसिंह जन्मदिवस

२००१ साली तत्कालीन सरकारने चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

National Farmer's Day | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...