Black Turmeric Benefits : दिसायला जरी काळी, पण ही हळद आरोग्यासाठी लयच भारी

Mahesh Gaikwad

हळदीचं दूध

घरात कोणालाही खोकला आला तरी आई लगेच हळदीचं दूध प्यायला देते. तसंच साधी जखम जरी झाली तरी आपली आज्जी म्हणते हळद लाव रक्त थांबेल. अशी ही बहुगुणकारी हळद.

Black Turmeric | Agrowon

पिवळ्या रंगाची हळद

पण आपल्याया फक्त पिवळ्या रंगाची हळद माहितीये. तुम्ही कधी काळ्या रंगाची हळद पाहिलीये का? पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदही आरोग्यासाठी खूप गुणकारी मानली जाते.

Black Turmeric | Agrowon

हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण

पिवळ्या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जास्त असल्याने दिसायला तीचा रंग पिवळा असतो. मात्र, काळ्या हळदीमध्ये अँथोसायनीन घटक असल्याने तीचा रंग गडद जांभळ्या रंगाचा असतो.

Black Turmeric | Agrowon

काळी हळद

काळी हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ही हळदीचे पीक प्रामुख्याने देशातील पूर्वोत्तर भागात आणि मध्यप्रदेशात घेतले जाते.

Black Turmeric | Agrowon

काळी हळद गुणकारी

यामध्ये अँटीफंगल, अँटीअस्थमा, अँटीऑक्सिडेंट, एनाल्जेसिक या सारखे गुणधर्म असतात. श्वासासंबंधी आजारांमध्ये काळी हळद गुणकारी आहे.

Black Turmeric | Agrowon

काळ्या हळदीचा लेप

तसेच माईग्रेनच्या (अर्धशिशी) त्रासामध्ये काळ्या हळदीचा लेप खूप फायदेशीर असतो. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठीही काळी हळग फायदेशीर आहे.

Black Turmeric | Agrowon

काळ्या हळदीचे सेवन

याशिवाय वजन कमी करण्यासाठीही काळ्या हळदीचे सेवन विविध प्रकारे केले जाते. त्वचेसंबंधीच्या सर्व आजारांमध्ये काळ्या हळदीचा गुण दिसून येतो.

Black Turmeric | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

पिवळ्या हळदीप्रमाणेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही काळ्या हळदीची मदत होते.

Black Turmeric | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...