Swarali Pawar
हरभरा काढणीनंतर ३ महिने जमीन पडीक राहते. या काळात उन्हाळी मूग घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते.
उन्हाळी मूगाची काढणी मे–जूनमध्ये होते. हे उत्पन्न खरीप हंगामासाठी आर्थिक मदत ठरते.
उन्हाळी मूगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे किडनाशक खर्चात चांगली बचत होते.
भुईमुगाच्या तुलनेत मूगाला कमी पाणी लागते. कमी कालावधीत व कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते.
मूग काढणीनंतर मिळणारा भुस्सा प्रथिनयुक्त असतो. आपत्कालीन काळात पशुधनासाठी चांगली वैरण ठरते
मूगाच्या मुळावरील गाठींमुळे जमिनीत नत्र साठते. ४५ ते ६५ किलो नत्र प्रति हेक्टर उपलब्ध होते.
शेंगा तोडून पीक जमिनीत गाडल्यास हिरवळीचे खत मिळते. यामुळे जमिनीचा कस व उत्पादनक्षमता सुधारते.
सुरू ऊस लागवडीत मूग आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद देते. उत्पन्न वाढीसोबत जमीनही निरोगी राहते.