Swarali Pawar
कासेला संसर्ग होऊन सूज, वेदना व दुधात बदल होतो. हा आजार दुधाळ जनावरांत जास्त आढळतो.
स्ट्रेप्टोकोकस, स्टॅफायलोकोकस आणि ई. कोलाई जिवाणू कारणीभूत असतात. हे जिवाणू दुधातून व अस्वच्छतेमुळे पसरतात.
काऊ पॉक्स व लाळ्या-खूरकूतसारखे विषाणू कारणीभूत ठरतात. क्रिप्टोकोकस व मायकोप्लाझ्मा बुरशीमुळेही कासदाह होतो.
कासेला इजा, अपूर्ण दूध काढणे व अस्वच्छ गोठा कारणीभूत ठरतो. जास्त दूध देणाऱ्या गायींना कासदाहाचा धोका जास्त असतो.
संसर्गित पाणी व दूषित आच्छादनातून रोग पसरतो. दूध काढणाऱ्याच्या हातांमुळेही आजार होऊ शकतो.
ताप, भूक न लागणे आणि कास गरम व वेदनादायक होते. दूध पिवळसर दिसते व त्यात गाठी आढळतात.
कासेला सूज नसते पण कास कडक होते. दूध उत्पादन हळूहळू कमी होते.
कासेची तपासणी करून आकार व कडकपणा पाहतात. स्ट्रिप कप चाचणीत दुधात कण आढळल्यास कासदाह निश्चित होतो.