Millet In Diet : आहारात तृणधान्य का महत्त्वाची? जाणून घ्या कराण

Mahesh Gaikwad

बदलती जीवनशैली

बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असंतुलित आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Millet In Diet | Agrowon

आहारात तृणधान्य

ग्रामीण भागात आजही रोजच्या आहारामध्ये तृणधान्यांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी यांचा समावेश होतो.

Millet In Diet | Agrowon

ज्वारी

ज्वारीमध्ये विविध पोषक घटक असतात. लोह, फॉस्फरस, पोटॅशिअम तसेच जीवनसत्त्वे देखील मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ज्वारी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

Millet In Diet | Agrowon

बाजरी

बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखी पोषक तत्त्वे मुबलक असतात. ह्रदयाचे आरोग्य, हाडांची मजबूती, वजन कमी करणे, बध्दकोष्ट यासारख्या समस्यांसाठी बाजरी उत्तम आहे.

Millet In Diet | Agrowon

राळा

राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. मधुमेहाच्या रूग्णांसाठी राळ्याचे सेवन फायदेशी ठरते. यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Millet In Diet | Agrowon

नाचणी

नाचणीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, लोह, जस्त आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ग्लुटेनमुक्त आहारासाठी नाचणी उत्तम पर्याय आहे. तसेच वजन कमी करण्यासाठीही नाचणी फायदेशीर आहे.

Millet In Diet | Agrowon

ह्रदयाचे आरोग्य

गर्भवती मातांसाठी नाचणी हा उत्तम आहार आहे. नाचणीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे, ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

Millet In Diet