Mahesh Gaikwad
गेल्या काही वर्षांमध्ये पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. याचा परिणाम सध्या देशातील विविध भागात वाढलेल्या तापमानावरून दिसून येतो.
उष्णतेची लाट, भीषण गरमी आणि सातत्याने वाढणारे तापमान कमी करायचे असेल तर त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे वृक्षारोपण.
जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पृथ्वीचे तापमान कमी करणे शक्य आहे. त्यामुळे जंगले आणि झाडांचे महत्त्व मोठं आहे.
पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखण्याचे मोठे काम जंगले करतात. आणि म्हणूनच अॅमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुप्फुस असंही म्हटले जाते.
अॅमेझॉन हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्षावन आहे. जर अॅमेझॉनचे जंगल जर एखादा देश असता तर तो जगातील ९ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असता.
पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या तुलनेत एकटे अॅमेझॉन जंगल २० टक्के ऑक्सिजन या जंगलातून मिळतो.
दक्षिण अमेरिकेपासून ब्राझीलपर्यंत या जंगलाचा विस्तार पाहायला मिळतो. ऑक्सिजनशिवाय स्वच्छ पाण्यासाठीही या जंगलाची ओळख आहे.