Mahesh Gaikwad
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक धर्म, जाती, पंथ पाहायला मिळतात. प्रत्येक धर्माच्या संस्कृतीचे वेगळेपणही येथे पाहायला मिळते.
हिंदू धर्मामध्ये सापाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने नागाची पूजा करतात.
एकीकडे सापाला देव जरी मानत असले तरी एखाद्या घरात साप निघाला की भीतीपोटी त्याला हुसकावून लावतात किंवा त्याला मारून तरी टाकतात.
पण भारतात असे एक गाव आहे, ज्या गावातील लोक सापांसोबत राहतात. एवढंच नाही तर येथील घरांमध्ये साप पाळले जातात.
सामान्यत: घरांमध्ये लोक कुत्रा, मांजर पाळतात. परंतु महाराष्ट्रातील या गावात चक्क साप पाळतात.
इतकेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात, असे म्हटले तर तुम्हालाच घाम फुटेल.
हे साप लहान मुलांना इजा करत नाही, असा येथील लोकांचा समज आहे. त्यामुळे लहान मुलेही सापांसोबत खेळतात. असे असूनही आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नसल्याचे सांगितले जाते.
पण हे खरं आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ या गावातील काही घरांमध्ये साप पाळले जातात.