Sulfer Fertilizer Use : पिकासाठी गंधक का आहे फायदेशीर?

Team Agrowon

गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.

Sulfer Fertilizer Use | Agrowon

वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण

Sulfer Fertilizer Use | Agrowon

गंधक हे अमायनो अॅसिड तयार करण्यास मदत करते. तो त्याचा घटक आहे. उदा. सिस्टीन व सिस्टाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक आहे.

Sulfer Fertilizer Use | Agrowon

गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्त्वपूर्ण घटक आहे. 

Sulfer Fertilizer Use | Agrowon

गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.

Sulfer Fertilizer Use | Agrowon

गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.

Sulfer Fertilizer Use | Agrowon

वनस्पतींच्या निरनिराळ्या विकरांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते. फळे तयार होण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते.

Sulfer Fertilizer Use | Agrowon

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी योजनेत मोठे बदल, पाहा काय आहेत बदल...

आणखी पाहा...