Team Agrowon
मागूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिशमध्ये समाविष्ट केला गेला आहे.
हा मागूर मासा मानवी आरोग्यास हानिकारक असतो.
थाई मागूर जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांसाठी हानिकारक आहे.
हा मासा इतर माशांच्या प्रजाती लुप्त होण्यासही कारणीभूत समजला जातो.
हा मासा अनेकदा अजैविक कचऱ्याचे सेवन करतो.
माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिकचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे.
हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याने, १९९७ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे थाई मागूर माशावर बंदी घातली होती.