Mahesh Gaikwad
मराठा स्वातंत्र्य संग्रामात दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या भीमथडी अश्वाला स्वतंत्र प्रजातीचा दर्जा मिळणार आहे.
दुर्मिळ भीमथडी अश्वाला स्वतंत्र प्रजातीची मान्यता मिळावी, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
भीमथडी हा भीमा व नीरा नदीच्या खोऱ्यातील अश्व असून प्रामुख्याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांत आढळतो.
भीमथडी अश्वाचे आयुष्यमान ४० वर्षांचे असून सध्या या प्रजातीच्या घोड्यांची संख्या ५ हजार १३४ आहे.
अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटना आणि बारामती अश्वपागेच्या माध्यमातून भीमथडी अश्वांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.
या घोड्याला स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळावी, यासाठी एक हजाराहून अधिक घोड्यांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यातील ५०० नमुन्यांची डीएनए चाचणी करण्यात आली.
सध्या भटक्या घुमंतू समुदायाकडे या अश्वांची संख्या काही प्रमाणात आढळते. अश्वाच्या पोलो साहसी खेळात भीमथडीचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
येत्या २० व २१ जानेवारीला बारामती येथे होणाऱ्या ‘कृषक’मध्ये भीमथडी अश्व दाखवला जाणार आहे. अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटना आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.