Lumpy Skin Disease: लसीकरण करुनही लम्पी आटोक्यात का येत नाही?

Swarali Pawar

सततचा पाऊस धोकादायक

मेपासून चालू असलेल्या पावसामुळे डबकी तयार होत आहेत. यामुळे डास-माशांची संख्या वाढून विषाणूचा प्रसार वेगाने होतो.

Disease Causing Agent | Agrowon

जनावरांची प्रतिकारशक्ती कमी

वारंवार पावसात भिजल्याने जनावरं कमजोर होतात. थकवा आणि अपुरी विश्रांती यामुळेही त्यांची ताकद कमी होते.

Less Immunity | Agrowon

विषाणूतील सतत बदल

लम्पी विषाणू २०२२ पासून अनेकदा बदलला आहे. त्यामुळे लसीकरण असूनही तो पूर्णपणे थांबत नाही.

Lumpy Virus Mutation | Agrowon

यंदाच्या साथीची वैशिष्ट्ये

या वेळी भारतीय शुद्ध वंशाच्या गायींना जास्त लागण होत आहे. मागच्या वेळी संकरित गायींवर परिणाम झाला होता.

Lumpy in Indigenous Cows | Agrowon

रोगाशी गायींची लढाई

मूळ वंशाच्या गायींची प्रतिकारक्षमता चांगली असते. त्यामुळे लागण झाल्यासही त्या हळूहळू बऱ्या होत आहेत.

Indigenous Cows | Agrowon

जनावरांच्या बाजारावर निर्बंध नाहीत

काही भागात अजूनही जनावरांचे बाजार सुरू आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रसार आणखी वेगाने होत आहे.

Animal Market | Agrowon

योग्य काळजीचे महत्त्व

लम्पी २०% औषधोपचार आणि ८०% काळजीमुळे बरा होतो. शेतकरी जनावरांची योग्य काळजी घेत असल्याने बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

Animal Care | Agrowon

उपाय आणि पुढील दिशा

पावसाळा संपल्यावर लम्पीवर नियंत्रण मिळेल, असा अंदाज आहे. नवजात वासरांना तातडीने लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.

Vaccination to cows | Agrowon

Monsoon Livestock Care: पावसाळ्यात जनावरांचा आजारांचा धोका; कशी घ्यायची काळजी?

Livestock care | Agrowon
अधिक माहितीसाठी...