Swarali Pawar
लम्पी झाल्यास जनावरांना ताप येतो, त्वचेवर चट्टे पडतात व जखमा होतात. यासाठी लसीकरण आणि बाधित जनावर वेगळे ठेवणे अत्यावश्यक आहे.
घटसर्पात गळ्याला सूज येते, ताप येतो व खाणे-पिणे थांबते. फऱ्यात पायाला सूज येते. दोन्ही आजार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.
या आजारात जनावरांच्या तोंडातून लाळ गळते, खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडायला लागते. यावर सप्टेंबर आणि मार्च महिन्यात लसीकरण करणे फायदेशीर ठरते.
हा आजार जंतामुळे होतो. खाणे कमी होते, पोट फुगते व जनावर खंगते. पावसाळ्यापूर्वी व नंतर जंतनाशक औषध पाजणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात कोवळ्या गवतामुळे पोटफुगी, अपचन, हगवण आणि विषबाधा होऊ शकते. अशा वेळी शुद्ध पाणी, चांगला चारा आणि योग्य औषधोपचार आवश्यक आहेत.
दूध काढल्यानंतर सडातून जंत प्रवेशल्यास कास सुजते, दूध पाण्यासारखे होते आणि लालसर दिसते. दूध काढल्यानंतर टीट डिपिंग केल्याने संसर्ग टाळता येतो.
पावसाळ्यात गोचीड वाढतात, ज्यामुळे थायलेरियाचा ताप होतो. गोठ्याची स्वच्छता, गोचीड प्रतिबंधक पावडर व औषधोपचार आवश्यक आहेत.
गोठ्यात स्वच्छता राखा, कोरडी जागा द्या, वेळेवर लसीकरण करा आणि स्वच्छ पाणी-पोषक आहार द्या. यामुळे जनावरं निरोगी राहतात.