Mahesh Gaikwad
प्राचीन भारतीय परंपरेचा अविभाज्य घटक असलेल्या योगमुळे जगात भारताची वेगळी ओळख आहे.
मानवी जीवनात योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. योगामुळे मानवाच्या जीवनात शारीरिक, मानसिक आणि सकारात्मक बदल घडतात.
योगाभ्यास आणि त्याचे आरोग्यासाठी असणाऱ्या फायद्यांच्या जनजागृतीसाठी संपूर्ण जगात २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
२१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते.
या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशीरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
११ डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीद्वारे ठराव करत जागतिक योग दिवसाची घोषणा करण्यात आली.
भारतासह जगभरातील अनेक देशांना योग साधनेचे महत्त्व पटल्याने त्यांनी योगाचा स्विकार केला आहे.
आजघडीला जगभरात विविध प्रकारांमध्ये योगाभ्यासाचा सराव केला जातो आणि दिवसेंदिवस याची लोकप्रियता वाढत आहे.