Mahesh Gaikwad
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. नियमित योग केल्यामुळे स्नायू मजबूत आणि शरीर लवचिक होते.
दररोज नियमितपणे योगासने केल्यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच तुम्ही दिवसभर उर्जावान राहता.
योगासनाचे अनेक प्रकार आहेत. योगासानांचे आरोग्याला विविध प्रकारे फायदे होतात.
योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये शीर्षासनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. योगाभ्यासामध्ये या आसनाला सर्वोत्तम आसन मानले जाते.
शीर्षासन म्हणजे डोक्यावर उभे राहून केले जाणारे अति प्रभावी योगासन. या आसनामुळे शरीर व मन दोन्हीही संतुलित राहते.
शीर्षासनामुळे डोक्यापर्यंत रक्तप्रवाह वाढतो, यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळून एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थिरता वाढते.
डोक्याला पुरेसे रक्त व पोषण मिळाल्यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते तसेच केसांची गळती कमी होते व केसांची वाढही होते.
या आसनामुळे पचनक्रियेशी संबंधित अवयवांना उत्तेजना मिळते. परिणानी पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.