Gudi Padwa Festival : गुढीपाडवा का साजरा करतात?

Mahesh Gaikwad

हिंदू नववर्ष

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना वर्षाचा पहिला महिना मानला जातो.

Gudi Padwa Festival | Agowon

गुढीपाडवा सण

गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरावर गुढी उभारण्याची प्रथा आहे.

Gudi Padwa Festival | Agowon

सृष्टीची निर्मिती

वैदिक ग्रंथांनुसार गुढीपाडवा सण सृष्टीच्या निर्मितीचा दिवस मानला जातो. भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी ब्रह्मांडाची निर्मिती केल्याची मान्यता आहे.

Gudi Padwa Festival | Agowon

विजयाचे प्रतिक

हा दिवस प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढी उभारून साजरा केला जातो. विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते.

Gudi Padwa Festival | Agowon

रेशमी वस्त्र

बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठींची माळ आणि त्यावर पितळीचा तांब्या ठेवला जातो.

Gudi Padwa Festival | Agowon

कडुलिंब

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा मोहर आणि गूळ यांचे मिश्रण प्रसाद म्हणून खातात. यामुळे निरोगी आरोग्य लाभते, असे मानले जाते.

Gudi Padwa Festival | Agowon

गुढी उभारण्याची प्रथा

या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूधर्मीय आपल्या घरावर गुढी उभारतात. या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. तसेच घरामध्ये गोडधोड केले जाते आणि नववर्षाचे स्वागत केले जाते.

Gudi Padwa Festival | Agowon

मराठी नववर्ष

गुढीपाडवा हा आनंद, समृद्धी आणि नव्या संधींचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात हा सण मराठी नववर्ष म्हणूनही साजरा केला जातो.

Gudi Padwa Festival | Agowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....