Indian Rhinos : गेंड्यांसाठी प्रसिध्द असणारी भारतातील प्रमुख अभयारण्ये

Mahesh Gaikwad

एकशिंगी गेंडा

भारतात आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यात प्रामुख्याने सर्वाधिक एकशिंगी गेंडे आढळतात. या गेंड्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने उभारण्यात आली आहेत.

Indian Rhinos | Agrowon

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

हे राष्ट्रीय उद्यान असून येथे देशातील सर्वाधिक गेंडे आढळतात. युनेस्कोने या अभयारण्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. हे अभयारण्य ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेले प्रमुख अभयारण्य आहे.

Indian Rhinos | Agrowon

पोबितोरा अभयारण्य

या अभयारण्याची विशेषता म्हणजे या ठिकाणी गेंड्यांची सर्वाधिक घनता पाहायला मिळते. क्षेत्रफळाने लहान असूनही हे गेंड्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे अभयारण्य आहे.

Indian Rhinos | Agrowon

मानस राष्ट्रीय उद्यान

हे युनेस्कोने घोषित केलेल जागितक वारसा स्थळ आहे. या अभयारण्यामध्ये गेंड्यासह वाघ, हत्ती आणि दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन केलेले आहे.

Indian Rhinos | Agrowon

ओरांग राष्ट्रीय उद्यान

या अभयारण्याला छोटे काझीरंगा म्हणूनही ओळखले जाते. हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. गेंड्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी हे अभयारण्य प्रसिध्द आहे.

Indian Rhinos | Agrowon

दुधवा राष्ट्रीय उद्यान

उत्तर भारतातील गेंड्यांचे मुख्य अधिवास असणाऱ्या अभयारण्यापैकी हे एक आहे. पुनर्वसन प्रकल्पाद्वारे येथे गेंड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

Indian Rhinos | Agrowon

गेंड्यांचे संवर्धन

भारतात गेंड्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. यासाठी Indian Rhino Vision 2020 राबविले जात आहे.

Indian Rhinos | Agrowon

गेंड्यांची वाढती शिकार

गेंड्यांची वाढती शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास ही संवर्धनातील मोठी आव्हाने आहेत. ज्यावर उपाय करण्यासाठी सरकार आणि पर्यावरणसंरक्षक प्रयत्न करत आहेत.

Indian Rhinos | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....