Swarali Pawar
तुरा म्हणजे उसाचा फुलोरा येणे. तुरा आल्यानंतर उसाची वाढ थांबते.
हवामानातील बदल आणि जातीमुळे तुरा येतो. जास्त थंडी किंवा दिवसांची लांबी याचा परिणाम होतो.
तुरा आल्यावर उसाच्या कांड्यांची लांबी वाढत नाही. नवीन कांड्या तयार होणे बंद होते.
कांडीत साठलेली साखर तुरा निर्मितीसाठी वापरली जाते.
त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते.
वनस्पतीतील अन्नद्रव्ये तुरा तयार करण्याकडे वळतात. शाकीय वाढ थांबून प्रजनन अवस्था सुरू होते.
तुरा आल्यास ऊस उत्पादन घटते. साखर उताऱ्यावरही नकारात्मक परिणाम होतो.
तुरा आलेला ऊस गुणवत्तेने कमी पडतो. मिळणारा आर्थिक फायदा कमी होऊ शकतो.
तुरा येणे हे ऊस पिकासाठी नुकसानकारक ठरते. वेळीच निरीक्षण करून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.