Mahesh Gaikwad
भारतात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होते. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. तर एकूण निर्यातीत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा वाटा जळपास ४५ टक्के इतका आहे.
भारतात विविध वाणांच्या तांदूळ उत्पादित केला जातो. बासमती तांदूळ खाण्याला सर्वाधिक पसंती आहे. पण हा बासमती इतका महाग का असतो? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
सर्वसाधारण तांदळाच्या तुलनेत या तांदळाचे शीत मोठे आणि लांब असते. बासमतीचा तांदळाचे एक शीत ८.४४ मिमीपर्यंत लांब असते.
तांदूळ जितका जुना असतो तितका तो चांगला असतो. त्यामुळेच बासमती तांदळाच्या अनेक जाती १८ ते २४ महिन्यांपर्यंत साठवून ठेवतात. या प्रक्रियेमुळे भाताची किंमत वाढून तांदूळ महागात विकला जातो.
बासमती तांदूळ त्याच्या उच्च दर्जासाठी ओळखला जातो. शिवाय बासमती तांदळाचा विशिष्ठ सुगंध असतो. त्यामुळेच इतर तांदळाच्या तुलनेत हा महाग असतो.Basmati Rice
शिजवल्यानंतर बासमती तांदळाचा आकार त्याच्या मूळ आकारापेक्षा दुप्पट होतो. बासमतीमध्ये न्यूट्रीशनही जास्त प्रमाणात असतात.
चिकन, मटण बिर्याणी असो वा शाही पुलाव यासाठी बासमती तांदळाचाच वापर केला जातो.