Mahesh Gaikwad
ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. ड्रायफ्रूटलाच सुका मेवा असंही म्हणतात.
ड्रायफ्रूट्स अनेक प्रकारचे आहेत, ज्यात काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खजूर यांचा समावेश होतो.
ड्रायफ्रूट्सच्या यादीतील सुकी खारीक ही सर्वांचीच आवडती असते. पण एका दिवसात किती खारीक खावी? हे तुम्हाला माहित आहे का?
नैसर्गिक गोडवा असलेल्या खारीकमध्ये विटामिन आणि फायबर सारखे घटक असतात.
थंडीच्या दिवसांमध्ये तर आवर्जून खारीक खाल्ली जाते. कमजोर शरिरयष्टीच्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
एका दिवसात साधारणपणे कमीत कमी दोन ते तीन खारीक खावू शकता.
खारीक जर रात्रभर भिजवलेली असेल, तर अशी खारीक तीन ते पाच या प्रमाणतही खावी.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत पाच खारीकही तुम्ही खावू शकता.
हाडांपासून त्वचेसाठी खारीक खाणे हेल्दी मानले जाते.