Abhyang Snan 2026 : दिवाळीत अभ्यंगस्नान का केले जाते? जाणून घ्या याचे धार्मिक महत्त्व!

Anuradha Vipat

पवित्र आणि महत्त्वाचे स्थान

दिवाळीत अभ्यंगस्नानाला हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे.

Abhyang Snan 2026 | agrowon

अभ्यंगस्नान

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी अंगाला तेल आणि उटणे लावून जे स्नान केले जाते, त्याला 'अभ्यंगस्नान' म्हणतात.

Abhyang Snan 2026 | agrowon

महत्त्व

दिवाळीत अभ्यंगस्नान का केले जाते आणि त्याचे धार्मिक, वैज्ञानिक व आरोग्यदायी महत्त्व काय आहे, ते खालीलप्रमाणे आहे.

Abhyang Snan 2026 | agrowon

नरकासुराचा वध आणि विजय

पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्रजेला छळणाऱ्या नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

Abhyang Snan 2026 | agrowon

आनंदाचा प्रकाश

नरकासुराच्या तावडीतून हजारो स्त्रियांची मुक्तता करून श्रीकृष्णाने जगात आनंदाचा प्रकाश पसरवला.

Abhyang Snan 2026 | agrowon

प्रथा

हा विजय साजरा करण्यासाठी आणि नरकासुराच्या रक्ताचे डाग धुण्यासाठी श्रीकृष्णाने पहाटे अभ्यंगस्नान केले होते. तशी प्रथा तेव्हापासून सुरू झाली.

Abhyang Snan 2026 | agrowon

अलक्ष्मीचा नाश आणि लक्ष्मी प्राप्ती

अभ्यंगस्नान केल्याने घरातील आणि शरीरातील दारिद्र्य, आळस आणि नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समृद्धी व सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते.

Abhyang Snan 2026 | agrowon

Diwali Faral : नात्यात गोडवा आणणारा 'दिवाळी फराळ'; जाणून घ्या यामागील परंपरा आणि महत्त्व

Diwali Faral | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...