Chicken Rate : चिकनची मागणी का वाढली?

Team Agrowon

 बड्या कंपन्यांकडून अधिक वजनाच्या कुक्‍कुट पक्ष्यांचा पुरवठा बाजारात करून दर पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

Chicken Rate | Agrowon

त्यामुळेच गेल्यावर्षी नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात तेजी येत दर १०५ रुपये किलोवर पोहोचले असताना यंदा अवघ्या ६५ रुपये किलो दराने पक्ष्यांचा पुरवठा करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

पोल्ट्री व्यवसायावर सध्या पूर्णपणे कंपन्यांनी नियंत्रण मिळविल्याची स्थिती आहे. करारावर असा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना एका दिवसाचे पक्षी, खाद्य तसेच मेडिसिनचा पुरवठा केला जातो. त्यानंतर पक्ष्याचे अपेक्षित वजन मिळाल्यानंतर त्याची खरेदी कंपन्या करतात.

Chicken Rate | Agrowon

दोन किलो वजनापर्यंतचा पक्षी मिळविण्यासाठी अधिक खाद्य लागते. तुलनेत त्यापेक्षा अधिक वजन मिळविण्यकरिता कमी खाद्य लागते. त्यामुळे कंपन्या अधिक वजनाच्या पक्ष्याची उचल करून त्याचा बाजारात पुरवठा करतात. अधिक वजनाच्या पक्ष्याचे मांस चवीला योग्य राहत नाही.

Grampriya Chickens | Agrowon

त्यासोबतच त्यातील पौष्टिक घटकही कमी होतात, असा निष्कर्ष ‘माफसू’ने संशोधनाअंती नोंदविला आहे. .

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

बाजारातदेखील अधिक वजनाचे पक्षी आल्याने मागणी कमी होत दर कोसळतात. परिणामी वैयक्‍तिकस्तरावर शेतीपूरक व्यवसाय म्हणून याकडे वळलेल्या शेतकऱ्यांची कोंडी होते.

How to choose broiler chicken chicks | Agrowon
क्लिक करा